करणी सेनाप्रमुखाच्या हत्येप्रकरणी २ हल्लेखोरांसह तीन जण ताब्यात

चंदीगड- राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी काल मध्यरात्री २ हल्लेखोरंसह त्यांच्या अन्य एका साथीदाराला अटक केली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि राजस्थान पोलिस यांनी संयुक्त कारवाई करत काल या तिघांना चंदीगडमधून ताब्यात घेतले. रोहित राठोड आणि नितीन फौजी यांच्यासह उद्धम नावाच्या त्यांच्या अन्य एका साथीदाराला पोलिसांना अटक केली.
सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर रोहित राठोड आणि नितीन फौजी यांनी गोळीबार केला. दिल्ली पोलिसांनी रोहित आणि उधमला दिल्लीत आणले, तर नितीन फौजी सध्या राजस्थान पोलिसांच्या ताब्यात आहे. यापूर्वी या आरोपींच्या अटकेची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते.
पण काल मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत या तिघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोगामेडी यांच्या हत्येनंतर आरोपींनी शस्त्रे लपवून ठेवली होती. आरोपींनी राजस्थानमधून हरियाणातील हिसारला पळ काढला. त्यानंतर सर्व आरोपी हिमाचल प्रदेशातील मनाली येथे गेले. तिथे काही दिवस राहिल्यानंतर ते चंदीगडला परतले. ते चंदीगडमध्ये येताच त्यांना पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी त्यांचा शोध घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top