कराडच्या वराडे गावामध्ये आढळले मऊ पाठीचे कासव

कराड- तालुक्यातील वराडे गावामध्ये राहणारे शेतकरी चंदन रघुनाथ हजारे यांच्या शेतामध्ये दुर्मिळ समजले जाणारे मऊ पाठीचे कासव आढळून आले आहे.ही माहिती कळल्यानंतर वन विभागाने या कासवाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

चंदन हजारे हे आपल्या शेतात कामानिमित्त गेले असताना त्यांना हे कासव निदर्शनास आले.थोडेसे वेगळया स्वरूपाचे हे कासव दिसल्याने त्यांनी लगेच वनविभागाला याबाबत कळवले.त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी त्या कासवाला आपल्या ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता ते सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top