कर्जतचा हापूस बाजारात बदलापूरकरांची मोठी पसंती

बदलापूर- यंदा देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याचे दर अजूनही सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील असे नाहीत. बदाम, तोतापुरी आणि केसर सारख्या आंब्यांनाही हापूससारखी मजा नाही. त्यामुळे सध्या बदलापुरच्या बाजारात कर्जतच्या हापूस आंब्याची मोठी चलती दिसून येत आहे.कारण या आंब्याचा रंग आणि गोडवा हापूस सारखाच आहे.

कर्जत आणि पळसदरी परिसरातील आदिवासी बांधव हा हापूस सारखा दिसणारा आंबा बदलापुरात विक्रीसाठी आणत आहेत. या हापूसची चव व रंग जवळपास रत्नागिरी हापूससारखीच आहे.विशेष म्हणजे रसायनाचा वापर न करता नैसर्गिकपणे पिकवलेला हा आंबा परवडणार्‍या दरांत उपलब्ध आहे.३०० रुपये डझन भावाने हा आंबा विकला जात आहे.एक महिला सुमारे १५ ते २० डझन आंबे दिवसाला विकत असते. गेल्या काही वर्षांपासून हे आंबे बदलापूर बाजारात विक्रीसाठी आणले जात आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top