काँग्रेसच्या पाचव्या यादीत चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी

नवी दिल्ली – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पाचवी यादी जाहीर केली आहे. यात राजस्थानच्या दोन आणि महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे.

प्रतिभा धानोरकर या वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर यांचा चंद्रपूर मतदारसंघातून विजय झाला होता. महाराष्ट्रातून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकलेले ते एकमेव खासदार होते. गेल्या वर्षी मे महिन्यात बाळू धानोरकर यांचे निधन झाले. आता या मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर असा सामना रंगणार आहे.
तसेच राजस्थानातील जयपूरमध्ये कॉंग्रेसने सुनील शर्मा यांच्याऐवजी प्रताप सिंह खचरियावास आणि दौसा (अनुसूचित जाती) मतदारसंघातून मुरारी लाल मीना यांना उमेदवारी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top