काँग्रेस नेते राहुल गांधी २ मतदारसंघातून लढणार?

नवी दिल्ली

काँग्रेस नेते राहुल गांधी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. वायनाडमध्ये उद्या मतदान होणार आहे. उद्याचे मतदान झाल्यानंतर राहुल गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघातूनदेखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे. तसेच प्रियंका गांधीदेखील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १ ते ३ मे दरम्यान अमेठी मतदारसंघासाठी राहुल गांधी आणि रायबरेली मतदारसंघातून प्रियंका गांधी उमेदवारी अर्ज भरू शकतात. अमेठीतून निवडणूक लढवण्यासाठी राहुल गांधी तयार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी अमेठीत तळ ठोकला असून १ मे रोजी अमेठीमध्ये काँग्रेसचे मोठे शक्तिप्रदर्शन होणार असल्याचे सांगितले जात आहे. उद्या वायनाडमधील मतदान झाल्यानंतर राहुल गांधी २७ एप्रिलला अमेठीत पोहचण्याची शक्यता आहे. राहुल गांधी अमेठीतून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top