काश्मिरमध्ये शीख कामगाराची दहशतवाद्यांनी केली हत्या

श्रीनगर – शहरातील हब्बा कडल भागात काल बुधवारी दहशतवाद्यांनी पंजाबमधील एका शीख कामगाराची गोळ्या झाडून हत्या केली, तर आणखी एक जण जखमी झाला, असे अधिकाऱ्यांनी येथे सांगितले.
अमृतपाल सिंग(३१) असे या मृत कामगाराचे नाव असून हा पंजाबमधील अमृतसरचा रहिवासी आहे. त्याला दहशतवाद्यांनी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास हब्बा कडल येथील शल्ला कडल परिसरात एके रायफलने पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळ्या घातल्या.सिंग यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोहित (२५) हा परप्रांतातील अन्य एक कामगार जखमी झाला. रोहितही मूळचा अमृतसरचा आहे. त्याच्या पोटात गोळ्या लागल्या असून त्याच्यावर येथील एसएमएचएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेची दखल घेत हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी परिसराची नाकेबंदी केली आहे. या वर्षात काश्मीरमधील परप्रांतीयांवर दहशतवाद्यांनी केलेला हा पहिला हल्ला आहे.गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी अनंतनाग आणि शोपियान जिल्ह्यांसह खोऱ्यातील परप्रांतीय कामगारांवर अनेक हल्ले केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top