कॅनडाच्या दूरसंचार कंपनीने चारशे कामगारांना घरी बसविले

टोरंटो – कॅनडातील दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी बेलने अवघा दहा मिनिटांचा व्हिडिओ कॉल करून चारशे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. युनिफोर या कामगारांच्या संघटनेने हा दावा केला आहे.
युनिफोर ही कॅनडातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे. युनिफोरने बेल कंपनीच्या या निष्ठूरपणाचा तीव्र निषेध केला आहे. कंपनीची ही वर्तणूक लाजिरवाणे म्हणण्याच्याही पलिकडचे आहे, असे युनिफोरने प्रसृत केलेल्या निवदेनात म्हटले आहे.
बेल कंपनीने ज्या चारशे कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले त्यांना एक व्हिडिओ कॉल करण्यात आला होता. दहा मिनिटांच्या या व्हिडिओ कॉलमध्ये कंपनीने या कामगारांना सांगितले की, तुम्ही अतिरिक्त कर्मचारी ठरला आहात. त्यानंतर त्यांना कामावरून कमी केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top