केईएम रुग्णालयाला मिळाला हृदय प्रत्यारोपणाचा परवाना

मुंबई- वैद्यकीय विश्वात हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया जटिल आणि खर्चीक म्हणून ओळखली जाते. खासगी रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, त्यासाठी २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च येतो. सामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेली ही शस्त्रक्रिया आता मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातही होऊ शकणार आहे.त्यासाठी आवश्यक असलेला परवाना रुग्णालयाला सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळाला आहे.

केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.संगीत रावत यांनी सांगितले की,हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेणारे केईएम हे सार्वजनिक क्षेत्रातील राज्यातील पहिले रुग्णालय आहे.आम्हाला हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा परवाना मिळाला आहे.या शस्त्रक्रियेशी संबंधित काही यंत्र सामुग्री येणे बाकी आहे.ती लवकरच येणार आहे.त्यानंतर या शस्त्रक्रियांना यंदाच सुरुवात होणार आहे. मुंबईत ५९ रुग्ण हृदय प्रत्यारोपणासाठीच्या प्रतीक्षा यादीवर आहेत.

विशेष म्हणजे १९६८ मध्ये देशातील पहिल्या हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ.पी.के.सेन यांनी केईएममध्ये केली होती. कालांतराने काही कारणास्तव अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा हे सत्र सुरू होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top