केरळच्या मुख्यमंत्र्यांना उच्च न्यायालयाची नोटीस

कोची – केरळ उच्च न्यायालयाने काल शुक्रवारी मुख्यमंत्री पिनारई विजयन, त्यांची मुलगी टी.वीणा आणि काही इतर राजकीय नेत्यांना खाजगी खनिज कंपनी आणि तिची आयटी कंपनी यांच्यातील कथित आर्थिक व्यवहारांसंदर्भात नोटीस बजावली.
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती के.बाबू यांनी आयटी फर्म व्यवहार प्रकरणात ज्यांना नोटीस बजावली आहे.त्यामध्ये काँग्रेस नेते रमेश चेन्निथला, आययूएमएल म्हणजेच इंडियन युनियन मुस्लिम लीगचे नेते पीके कुन्हालीकुट्टी आणि व्हीके इब्राहिम कुंजू तसेच वीणा यांची कंपनी एक्झालॉजिक सोल्युशन यांचा समावेश आहे.न्यायालयाने याप्रकरणी यापूर्वी एका वकिलाची अॅमिकस क्युरी म्हणून याचिकाकर्ते कलामासरी येथील सामाजिक कार्यकर्ते गिरीश बाबू यांच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी नियुक्त केले होते.ज्यांचा खटला प्रलंबित असताना मृत्यू झाला होता.उच्च न्यायालयात याचिकाकर्ते गिरीश बाबू यांनी कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड आणि वीणा यांची कंपनी तसेच काही संशयित राजकीय नेते यांच्यातील कथित बेकायदेशीर आर्थिक व्यवहाराच्या चौकशीची याचिका फेटाळणार्‍या मुवट्टुपुझा या दक्षता विशेष न्यायालयाच्या आदेशाला याचिकाकर्ते गिरीश बाबू यांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.या याचिकेवर काल सुनावणी झाली. त्यावेळी ही नोटीस बजावण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top