केवळ पाच कृषी मालाच्या निर्यातीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

नवी दिल्ली- भारताची कृषी निर्यात तांदूळ आणि साखरेसह केवळ पाच वस्तूंवर अवलंबून आहे.ही निर्यात तब्बल ५१.५ टक्के आहे.याचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसत असून हे क्षेत्र जागतिक किमती आणि मागणीतील चढउतारांना असुरक्षित बनवत आहे, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटीव्ह अर्थात जीटीआरआयच्या आर्थिक थिंक टँकच्या अहवालात सोमवारी म्हटले आहे.
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हने म्हटले आहे की, बासमती तांदूळ,बिगर बासमती तांदूळ,साखर, मसाले आणि खाद्यतेल या पाच कृषी उत्पादनांचा भारताच्या एकूण कृषी निर्यातीमध्ये ५१.५ टक्के आहेत.शिवाय भारत विविध देशांतर्गत आव्हानांना तोंड देत आहे ज्यामध्ये पायाभूत सुविधांची कमतरता,गुणवत्ता नियंत्रण समस्या आणि नॉन-टेरिफ अडथळे आहेत, जे सर्व त्याच्या कृषी क्षेत्राच्या वाढीस आणि स्पर्धात्मकतेला अडथळा आणतात. या पाच वस्तूंना भारतात वारंवार निर्यात बंदी देखील सहन करावी लागत आहे.
या अहवालात असेही म्हटले आहे की,कृषी निर्यात आणि आयात ४३३ अब्ज आणि डॉलर्स ३३ अब्ज पोहचण्याचा अंदाज असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत या क्षेत्रामध्ये कमालीची घट झाली आहे. ही घट तांदूळ आणि साखर यांच्या निर्यातीवर भर दिल्याने झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top