केवळ १० मतदारांसाठी तेलंगणात मतदान केंद्रे

हैदराबाद – निवडणूक आयोगाने तेलंगणा राज्यात यावेळी प्रत्येक मताला महत्त्व असल्याचे दाखवून दिले आहे.कारण यंदा तेलंगणाच्या दुर्गम आदिवासी भागात केवळ १० मतदार असलेल्या ठिकाणीही मतदान केंद्र उभारले जाणार आहे.अशी दोन मतदान केंद्रे उभारली जात असून ती देशातील सर्वांत लहान मतदान केंद्रे ठरली आहेत.

ज्या मतदारांना पूर्वी मतदान करण्यासाठी दुर्गम,खडतर असे २० किमीचे अंतर पार करावे लागत होते.आता त्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणीच मतदान करण्याची सोय करण्यात आली आहे.राज्याच्या विविध भागात ही दोन सर्वांत छोटी मतदान केंद्रे आहे.या प्रत्येक केंद्रावर एक स्वयंसेवक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सहा निवडणूक अधिकारी कार्यरत असतील.नगरकुर्नूल लोकसभा मतदारसंघातील अचमपेट विधानसभा मतदारसंघांतर्गत मल्लापू ‘पेंटा’ येथील एका खाजगी इमारतीत १० मतदारांसाठी एक सहायक मतदान केंद्र उभारले जाईल, तर दुसरे सहायक मतदान केंद्र नालगोंडा लोकसभा मतदारसंघांतर्गत देवरकोंडा विधानसभा क्षेत्रातील बुडीदगट्टू या अंगणवाडी केंद्रावर असेल.तसेच उंडे नागरकुरनूल, नलगोंडा आणि महबूबाबाद लोकसभा मतदारसंघात आणखी एकूण १० लहान मतदान केंद्रे स्थापन केली जाणार आहेत.याठिकाणी १० ते २६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top