कोकण रेल्वे मार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक

रत्नागिरी

कोकण रेल्वे मार्गावर येत्या ९ आणि १० नोव्हेंबर रोजी रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक जाहीर केला आहे. कुमटा ते बटकळ आणि रत्नागिरी ते वैभववाडी रोड या विभागातील रेल्वे मार्गाच्या आणि मालमत्तेच्या देखभालीसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या ब्लॉकमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

कुमटा – भटकळ विभागात ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या वेळेत तीन तासांचा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गाडी क्र.१६५८५ बंगळुरू ते मुर्डेश्वर एक्स्प्रेसचा प्रवास ८ नोव्हेंबर रोजी भटकळ स्टेशनवर अल्पकाळ थांबेल. गाडी क्र. १६५८६ मुर्डेश्वर ते बंगळुरू एक्स्प्रेसचा प्रवास ९ नोव्हेंबर रोजी भटकळ स्थानकावरून नियोजित वेळेवर सुरू होईल आणि मुर्डेश्वर ते भटकळ विभागादरम्यान अंशतः रद्द होईल. दरम्यान रत्नागिरी ते वैभववाडी रोड विभागात १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते ११ असा एकूण अडीच तासांचा मोगा ब्लॅाक असेल. गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास ९ नोव्हेंबर रोजी उडुपी ते कणकवली विभागादरम्यान अडीच तासांसाठी नियमित केला जाणार आहे. गाडी क्र.१०१०६ सावंतवाडी रोड ते दिवा एक्स्प्रेसाचा प्रवास सावंतवाडी रोड ते कणकवली स्टेशन दरम्यान १० नोव्हेंबर रोजी ३० मिनिटांसाठी नियमित केला जाणार आहे. गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी ते मडगाव १० नोव्हेंबर रोजी जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी स्थानकावर दहा मिनिटांसाठी नियमित केला जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top