कोट्यवधी रुपये खर्च करूनही उरणच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे

उरण – आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करूनही उरणच्या खोपटा- कोप्रोली मार्गावर खड्डेच खड्डे दिसत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावरील अपघात आणि वाहतूककोंडीत वाढ झाली आहे.

खोपटा-कोप्रोली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. जेएनपीटी बंदरामुळे खोपटे परिसरात बंदरावर आधारित गोदाम उभारण्यात आले आहे. या मार्गावरून दररोज हजारो अवजड कंटेनर वाहने ये-जा करीत असतात. मात्र मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाच्या प्रवेशद्वाराजवळ खोपटा-कोप्रोली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता खड्डेमुक्त करावा अशी मागणी वाहनधारक आणि प्रवाशी करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top