कोनशिलेवरील छगन भुजबळांचे नाव फोडले

नाशिक – छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास विरोध केल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे. काल छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असेलेल्या येवल्यामध्ये तोडफोड करण्यात आली. मराठा आंदोलनात ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा सहभाग आहे. निफाड तालुक्यातील सारोळे खुर्दे येथे ग्रामपंचायतीचे संगणक हॉल, आधुनिक स्वछतागृह आणि संरक्षक भिंतीवरील बांधकामाच्या उद्घटनावेळी लावलेली कोनशिला आंदोलकांनी फोडली. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव व पद आंदोलकांनी कोनशिलेवरून काढून टाकले. विशेष म्हणजे हे गाव छगन भुजबळ यांच्या मतदार संघातील आहे. त्यामुळे मतदार संघातील गावात रोष व्यक्त केल्यामुळे अनेक राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top