कोल्हापूर :
येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली. आज सकाळी धार्मिक विधीनंतर अंबाबाईच्या मूर्तीचे दर्शन पूर्ववत सुरू झाले. गेले दोन दिवस मूर्तीच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे भविकांना मूळ मूर्तीचे दर्शन बंद होते. पितळी उंबऱ्याबाहेरून उत्सवमूर्ती आणि कलशाच्या दर्शनाची सुविधा भाविकांसाठी देण्यात आली. ही संवर्धन प्रक्रिया पुरातत्व रसायनतज्ञ विभागाचे उपअधिक्षक डॉ. एस. विनोद कुमार, वरिष्ठ प्रतिमाकार सुधीर वाघ, प्रतिमाकार मनोज सोनवणे यांनी पूर्ण केली आहे.