कोस्टल रोड सी-लिंकला जोडणार! मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार

मुंबई

मुंबईतील कोस्टल रोड आता वरळी- वांद्रे सी-लिंकला जोडणार असल्याने मुंबईची वाहतूक कोंडी कमी होणार आहे. त्याचबरोबर यामुळे नागरिकांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सी-लिंकवरून थेट दक्षिण मुंबईत प्रवेश करता येणार आहे. या पुलाचे काम सध्या वेगाने सुरू असून येत्या दोन ते तीन दिवसात गर्डर बसवण्याचे काम पूर्ण होणार आहे.

बोर गार्डन हा संपूर्ण स्टील बनावटीचा असलेला गर्डर पुढील १०० वर्षे टिकेल, इतका मजबूत केला जाणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हा गर्डर बसवण्यात येणार आहे. अरबी समुद्रातील भरती आणि आहोटीच्या वेळा पाहूनच ही सगळी कामे करण्यात येणार आहेत. हा गर्डर ३३६ मीटर एवढा लांब असून त्यामुळे आता कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंक यांतील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. हा गर्डर २००० मेट्रिक टनचा आहे. संपूर्ण गर्डर जपानी तंत्रज्ञानाने कोटिंग केलेला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top