खर्च कमी करण्यासाठी गुगल पुन्हा शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ देणार

कॅलिफोर्निया

गुगल त्यांच्या डिजिटल असिस्टंट, हार्डवेअर आणि इंजिनिअरींग टीममध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना लवकरच नारळ देणार आहे. खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हा निर्णय खर्च कमी करण्यासाठी कंपनीच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. गुगलने याआधी एक वर्षापूर्वी १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते.

गुगल असिस्टंट, व्हॉईस- ॲक्टिव्हेटेड तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांवर आणि ऑगमेंटेड रिॲलिटी हार्डवेअर टीममधील कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा फटका बसेल. कंपनीच्या सेंट्रल इंजिनिअरींग ऑर्गनायजेशनमध्येही नोकऱ्यांमध्ये कपात होणार आहे. एका निवेदनात गुगल प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे की, “२०२३ च्या उत्तरार्धात आमच्या अनेक टीमने कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आणि आमच्या सर्वोच्च उत्पादन प्राधान्यांनुसार संसाधने अधिक चांगल्या प्रकारे संरेखित करण्यासाठी बदल केले. काही टीम अजूनही या संघटनात्मक बदलांची अंमलबजावणी करत आहेत, ज्यामुळे दुर्दैवाने जागतिक पातळीवर नोकऱ्यांमध्ये कपात केली जात आहे.” दरम्यान, प्रभावित कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे की, त्यांना गुगलमध्ये इतर खुल्या पदांसाठी अर्ज करण्याची संधी मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top