खाद्यतेलाच्या दरात घट दिवाळीत गृहिणींना दिलासा

पुणे

बहुतांश अन्नधान्याच्या दरात वाढ झाली असताना दिवाळीनिमित्ताने खाद्यतेलाच्या दरात घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. गेल्या दिवाळीच्या तुलनेत सूर्यफूल, पाम, सोयाबीन, सरकी तेलाच्या दरात ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. शेंगदाणा तेलाचे दर अजूनही टिकून आहेत. गेल्या वर्षी खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली होती. परदेशातून सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आवक नियमित सुरू आहे. खाद्यतेलाची आयात वाढली आहे. इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थिती सुघारली असल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाची मागणी कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट होत आहे.

मार्केट यार्डातील चिमणलाल गोविंददास पेढीचे भागीदार, खाद्यतेल व्यापारी कन्हैयालाल गुजराती यांनी दिलेल्या माहितीनुसार. सध्या पाम तेलाचे १५ किलोचे दर १३५० ते १५०० रुपये आहेत, तर गेल्यावर्षीचे दर २१०० ते २१५० रुपये होते. सूर्यफूल तेलाचे १५ किलोचे दर १४०० ते १५०० रुपये आहेत, तर गेल्यावर्षीचे दर २३०० ते २४०० रुपये होते. सोयाबीन तेलाचे १५ किलोचे दर १४०० ते १५०० रुपये आहेत, तर गेल्यावर्षीचे दर २३०० ते २४०० रुपये होते. सरकी तेलाचे १५ किलोचे दर १४०० ते १५५० रुपये रुपये आहेत, तर गेल्यावर्षीचे दर २२०० रुपये होते. वनस्पती तूप तेलाचे १५ किलोचे दर १४०० ते १६०० रुपये आहेत, तर गेल्यावर्षीचे दर १९०० ते २००० रुपये होते. शेंगदाणा तेलाचे १५ किलोचे दर २७०० ते २८०० रुपये रुपये आहेत, तर गेल्यावर्षीचे दर २८०० ते २९०० रुपये होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top