खामगावचा रब्बी हंगाम धोक्यात सर्व प्रकारचे जलसाठे कोरडे पडले

छत्रपती संभाजीनगर – यंदा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात यंदा पावसाअभावी रब्बीचा हंगाम धोक्यात आला आहे. जुलै आणि सप्टेंबर पावसाची उघडझाप आणि जून आणि ऑगस्ट कोरडा गेला.आता तर चालू नोव्हेंबर महिन्यात कडक ऊन असल्याने शेतजमिनी आणि सर्व जलसाठे कोरडे पडले आहेत.

या वर्षी पावसाअभावी खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले.मका पिकातून लागवड खर्चही निघणे अवघड झाले आहे. कपाशीचीही तीच अवस्था आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी पिकांवर होती.मात्र, सद्यःस्थिती पाहता तर रब्बी हंगामाचे भवितव्य अधांतरी आहे. दिवाळीत चांगला पाऊस पडला तर रब्बीसाठी जमिनीत ओलावा निर्माण होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर नदी, नाले, पाझर तलाव,आणि विहिरी आदी जलसाठेही तहानलेले आहेत.हे जलसाठे कोरडे पडत आहेत.सध्या तालुक्याच्या काही भागात मका सोंगणीची लगबग चालू आहे.काही शेतकऱ्यांनी पुढील पिकाच्या पेरणीची तयारी केली आहे. त्यातून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटेल,अशी आशा त्यांना वाट लागते. यंदा रब्बीचे गहू, हरभरा व कांदा पीक धोक्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top