खासगी मालकीच्या जागेतील दिवा बसस्थानक अडचणीत

ठाणे- ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहरात असलेले बसस्थानक हे खासगी मालकीच्या जागेत असल्याने अनेक अडचणींना तोंड देत आहे.या स्थानकावर रस्ता किंवा काँक्रिटीकरण करणे अवघड झाले आहे.या ठिकाणी प्रवाशांना बसण्याची सोयही नाही.
ठाणे महापालिकेने कोरोना काळापासून दिवा शहरात बसस्थानक सुरू केले आहे. पण बसस्थानकाची जागा ही खासगी मालकीची असल्याने आणि त्याठिकाणी असलेल्या विद्युत खांबामुळे वाहतूक कोंडी होत आहे.ठाणे आणि नवी मुंबई परिवहन सेवेच्या वेळेनुसार सुटणार्‍या गाड्या त्यामुळे ताटकळत ठेवाव्या लागत आहेत.विशेष म्हणजे जिथे बसेस थांबवतात, तिथेही खासगी जागा मालक लवकर बसेस हटवण्याचा प्रयत्न करतो. दिवा शहरातून कोट्यवधी रुपयांचा महसुल मिळूनही पालिका बस स्थानकासाठी स्वतंत्र जागा का बघत नाही, हे प्रवाशांना पडलेले कोडे आहे.वर्षातील बाराही महिने निव्वळ नावाला असलेल्या या बस स्थानकाच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top