खासदार राजवीर दिलेर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

लखनौ

उत्तर प्रदेशातील हाथरस लोकसभा मतदार संघाचे भाजपा खासदार राजवीर सिंग दिलेर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने समर्थकांसह कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजवीर सिंग दिलेर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर म्हटले आहे की, ‘राजवीर सिंग दिलेर यांंच्या अकाली निधनाने दु:ख झाले आहे. दिलेर यांच्या निधनाने पक्षाला धक्का बसला आहे. दिलेर त्यांच्या कार्यासाठी नेहमीच स्मरणात राहतील.’ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दिलेर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

दिलेर यांना २०१७ मध्ये भाजपाने इगलस विधानसभेतून उमेदवार म्हणून उभे केले. त्यावेळी ते विक्रमी मतांनी विजयी झाले होते. २०१९ मध्ये त्यांना हाथरस लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते. या निवडणुकीतही ते विजयी झाले होते. मात्र यंदा त्यांना लोकसभेसाठी तिकीट देण्यात आले नव्हते. राजवीर दिलर हे मूळचा अलिगढचे रहिवासी होते. यावेळी भाजपाने त्यांचे तिकीट रद्द केले आणि त्यांच्या जागी राज्य सरकारचे महसूल मंत्री अनुप वाल्मिकी यांना उमेदवारी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top