गरिबीला कंटाळून कामगाराने ७ मुलांसह पत्नीला संपवले

इस्लामाबाद : पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एका गरीब कामगाराने पोटची ७ मुले आणि बायकोची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली आहे. ही घटना मुझफ्फरनगर जिल्ह्यातील अलीपूर या गावात घडली आहे. पोलिसांनी या कामगाराला अटक केली आहे.
आर्थिक परिस्थिती अत्यंत खालवली असल्याने, मुलांचे पोषण करणार कसे या विवंचनेतून या कामगाराने हे टोकाचे पाऊल उचलले. या कामगाराने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मुलांचे पोषण करण्याची परिस्थिती नसल्याने मुलांची आणि बायकोची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या ७ मुलांत ४ मुली आणि ३ मुलगे आहेत. सर्वांत लहान मुलाचे वय ८ महिने तर मोठ्या मुलीचे वय १० वर्ष होते. दरम्यान,पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. पाकिस्तानने जागतिक नाणेनिधीकडे अर्थसहाय्य मागितले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top