गायक मुसेवाला याच्या आईने ५८ व्या वर्षी दिला बाळाला जन्म

चंदीगड – दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे.मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. चरण कौर यांनी आयव्हीएफ तंत्राचा वापर करून ही अपत्यप्राप्ती केली आहे.
लोकप्रिय गायक सिध्दू मुसेवाला याची २०२२ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.मुसेवाला कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा होता.काही दिवसांपूर्वी सिध्दूची आई चरण कौर या गर्भवती असल्याची बातमी समोर आल्यानंतर चर्चांना उधाण आले होते.त्यानंतर आता त्यांच्या कुटुंबियांनीच ही आनंदाची बातमी दिली आहे.सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी मुलाचा फोटो शेअर केला आहे. सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या लहान मुलाचा फोटो शेअर करताना लिहिले आहे,‘शुभदीपवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांच्या आशीर्वादाने देवाने शुभच्या धाकट्या भावाला आमच्या कुशीत आणले आहे.देवाच्या आशीर्वादाने कुटुंब निरोगी आहे आणि सर्व हितचिंतकांच्या अपार प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top