गोंदियात २ ट्रकची धडक तिघांचा जागीच मृत्यू

गोंदिया :

जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई – हावडा महामार्गावरील धोबीसराड गावाजवळ नादुरुस्त असलेल्या ट्रकला दुसऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

ट्रक चालक रोशन भीमराव सोनुने (३५) व वाहक प्रमोद नामदेवराव इंगळे (४०) आणि दुसरा ट्रक चालक अनवरखान अशरफ खान पठाण (२६) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. आज पहाटे ट्रकमध्ये बिगाड आल्याने वाहन दुरुस्ती करीता महामार्गाच्या एका कडेला हा ट्रक उभा करण्यात आला होता. या वाहनाच्या वाहनचालक व वाहकाकडून दुरुस्तीचे काम सुरू असताना मागून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकने या वाहनाला जबर धडक दिली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून देवरी पोलिसांनी घटना स्थळी पोहचून तिघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. देवरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top