गोव्याच्या ग्रामीण भागात १५ दिवस शिमगोत्सव

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून हा उत्सव पुढील १५ दिवस चालणार आहे. स्थानिक देवदेवतांच्या समोर होळी रोवल्यानंतर गावागावात शिमगोत्सव सुरू होतो. यंदा साखळी शहरात उद्या बुधवार २७ मार्च रोजी संध्याकाळी शिगमोत्सव शोभायात्रेचा उद्‍घाटन सोहळा पार पडणार आहे.

साखळी नगरपालिका व साखळी शिमगोत्सव समितीच्या सहकार्याने पर्यटन खात्याने आयोजित केलेल्या या शोभायात्रेत राज्यातील चित्ररथ, रोमटामेळ,लोककला पथके आदी सहभागी होणार आहेत. उद्याच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून लोककला कलाकार झिलू गावकर, हेल्थवेचे वरिष्ठ डॉ.मधुमोहन देसाई, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर हे उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर अखिल गोवा पातळीवर ८ ते १४ या वयोगटातील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा घेतली जाईल. कुडणे साखळीत प्रसिद्ध गडे उत्सवाची सांगता होळीच्या दिवशी झाली. यावेळी विविध मंदिरातून देवींचा कळसोत्सव, तरंगोत्सव आणि होमकुंड उत्सव साजरा केला जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top