ग्रीसची घटती लोकसंख्या! पंतप्रधानानी व्यक्त केली चिंता

अथेन्स- ग्रीसमधील घटती लोकसंख्या ही एखाद्या टाईमबॉम्ब प्रमाणे धोकादायक असल्याचे मत ग्रीसचे पंतप्रधान कायरिकोस मिटसोटाकीस यांनी व्यक्त केले आहे.
लोकसंख्या कमी होण्याच्या या धोक्याला डिपॉप्युलेशन असे संबोधण्यात येत असून त्यामध्ये एखाद्या भागातील लोकसंख्या कमालीची कमी होते. २०११ ते २०२१ या दहावर्षात ग्रीसमधील जन्मदर केवळ ३० टक्के इतका राहिला आहे. त्यानुसार येथील जन्माचे प्रमाण हे वर्षाला केवळ ८४ हजार इतकेच असून गेल्या अनेक वर्षांमध्ये मृत्युदर वाढलेला आहे. हदयरोग, कॅन्सर, स्ट्रोक सारख्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. हा प्रश्न केवळ ग्रीसलाच पडलेला नसून अनेक युरोपियन देशांनाही ही समस्या भेडसावत आहे. २०५० पर्यंत ग्रीसची लोकसंख्या ही एक लाखापेक्षाही कमी होईल असा इशाराही एका अहवालात देण्यात आला आहे. सध्या ग्रीसमध्ये दोन मृत्यूंच्या प्रमाणात एक जन्म होत असल्याचेही ग्रीसचे पंतप्रधान मिटसोटकिस यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top