चिंचवलीची शुक नदी आटू लागली खासगी शेतीपंप तत्काळ बंद करा

  • तहसीलदारांकडे
    निवेदनाद्वारे मागणी !

सिंधुदुर्ग- कणकवली तालुक्यातील खारेपाटण शहराजवळून वाहणारी चिंचवलीची शुक नदी आटू लागली आहे. त्यातच खासगी शेतीपंप सुरू असल्याने या नदीची पाणीपातळी आणखी झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाई उद्भवण्याची भीती असल्याने प्रशासनाने हे खासगी शेतीपंप तत्काळ बंद करावेत,अशी मागणी करणारे निवेदन चिंचवली ग्रामस्थांनी वैभववाडीच्या तहसीलदारांना दिले आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर वाहणार्‍या शुक नदीच्या काठावर या दोन्ही जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आपली शेतीपंपांची जोडणी केली आहे. मात्र सध्याच्या प्रखर उन्हाळ्यात या नदीची पाणीपातळी नैसर्गिकरीत्या कमी होत चालली आहे. त्यातच हे शेतीपंप सुरू असल्याने या नदीचे पाणी वेगाने आटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंचवली, शेरपे, तिथवली, बेर्ले आणि कुरगवणे आदी गावातील शेतकऱ्यांचे हे शेतीपंप आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेऊन या खासगी शेतीपंपावर तात्पुरते बंधन आणावे, अशी मागणी करणारे निवेदन चिंचवलीचे सरपंच अशोक पाटील यांनी नुकतेच तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top