चिरनेरच्या श्री महागणपती दर्शनासाठी उमेदवारांची गर्दी

उरण- हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चिरनेर गावातील श्री महागणपती चरणी नतमस्तक होण्याचा योग भाविकांसाठी कालच्या संकष्ट चतुर्थी निमित्ताने जुळून आला.त्यामुळे महागणपती चिरनेर चरणी नतमस्तक होण्यासाठी नवी मुंबई, ठाणे,कल्याण, डोंबिवली,पनवेल,पेण व उरण येथील अनेक भक्तांनी आपापल्या कुटुंबासह मंदिरात गर्दी केल्याचे चित्र दिसले.त्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांची उपस्थितीही प्रकर्षाने दिसून आली.

उरण तालुक्यातील चिरनेर, दिघोडे आणि जासई या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवार नोव्हेंबर रोजी होणार आहेत.त्यामुळे या ग्रामपंचायत उमेदवारांबरोबर कार्यकर्ते श्रींच्या चरणी दर्शनासाठी गर्दी करत होते. नवसाला पावणारा गणपती म्हणून चिरनेर गावातील महागणपतीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते हे काल बुधवारी श्री गणेशाच्या मंदिरात दर्शनार्थ पहाटेच्या सुमारास ये-जा करत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.यावेळी मंदिरात श्रीचे अभिषेक,सकाळी काकड आरती,भजन आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top