चीनची ‘नामांतर’ कुरघोडी तिबेटचे नावच बदलले !

बीजिंग- चीन सरकारने आता जगातील सर्वांत उंच पठार समजल्या जाणार्‍या तिबेटचे नाव बदलण्याची कुरघोडी केली आहे.मात्र या नामांतरामुळे तिबेटच्या स्थानिक जनतेमध्ये कमालीची नाराजी दिसत आहे.चीन सरकारने प्रसिद्ध केलेल्या एका श्वेतपत्रिकेत तिबेटचा उल्लेख ‘झिझांग’ किंवा शिझांग असा केला आहे. ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध झाल्यापासून चीनच्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकामध्ये तिबेटऐवजी ‘झिझांग’ असे म्हटले जावू लागले आहे.१९५० मध्ये चीनने तिबेटवर ताबा मिळविल्यापासून ते तेथील बौद्ध संस्कृती पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.चीनने आतापर्यंत तिबेटमधील बौद्ध मठ देखील नष्ट केले आहेत. तसेच जनतेची अनेक आंदोलने मोडून काढली आहेत.आता तर चीनने तिबेटचे नावच अधिकृतपणे बदलून टाकले आहे.चीनची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या ‘शिन्हुआ’ने सुद्धा त्यांच्या इंग्रजी भाषेतील १२८ लेखांमध्ये तिबेटचा उल्लेख झिझांग असा केला आहे.चीनमधील अन्य प्रसारमाध्यमे सुद्धा तसाच शब्दप्रयोग करू लागले आहेत.यामुळे स्थानिक जनतेत मात्र कमालीचा संताप दिसून येत आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top