चीनच्या कोळसा कंपनीच्या कार्यालयात आग! २५ ठार

बीजिंग :

चीनच्या उत्तर शांक्सी प्रांतात कोळसा कंपनीच्या कार्यालयाच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. देशातील सर्वात मोठ्या कोळसा उत्पादक योंगजू कोल कंपनीत सकाळी ६.५० वाजता ही दुर्घटना घडली. या घटनेचा तपास सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

चीनमधील कोळसा खाणीत अलिकडे घडलेल्या काही अपघातांमुळे येथील कोळसा खाणी अडचणीत आहेत. या घटनांमुळे सुरक्षा तपासणी युद्धपातळीवर सुरू असल्याने खाणींचे काम थांबवले आहे, यामुळे कोळसा उत्पादनाचा तोल ढसाळला आहे. यापूर्वी चीनमध्ये एप्रिलमध्ये बीजिंगमधील हॉस्पिटलला आग लागली होती. यामध्ये २९ लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top