छत्तीसगड-तेलंगण सीमेवर ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड- छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर आज सकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. उसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन्ही बाजूंनी हा गोळीबार झाला. यात तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले छत्तीसगडचे विजापूर पोलीस आणि ग्रेहाऊंड टीमने ही संयुक्त कारवाई केली. यावेळी जवानांनी एके-४७, एलएमजीसारखी शस्त्रेही जप्त केली.
तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या विजापूर जिल्ह्यातील पुजारी कांकेर येथील करिगुटा जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सीजी पोलीस आणि तेलंगणाच्या ग्रेहाऊंड फोर्सने तरुण माओवाद्यांना घेरण्यासाठी संयुक्त कारवाई सुरू केली. काल रात्री ही फोर्स नक्षलवाद्यांच्या मुख्य भागात पोहोचली. दोन्ही बाजूंनी नक्षलवाद्यांना घेरले होते. आज सकाळी सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली, यावेळी ३ नक्षलवादी ठार झाले. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सध्या घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top