जळगाव जामोदमधील भारतीय वायुसेनेतील जवान शहीद

जळगाव: भारतीय वायुसेना बंगलोर येथील मेडिकल ट्रेनिंग सेंटर युनिटमधील कम्युनिकेशन टेक्निशियन पदावर कार्यरत असलेले मिथिल दिलीपराव देशमुख कार्यरत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना वायुदलाच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. उद्या १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

जळगाव जामोद वाडी खुर्द येथील पेट्रोलपंपामागे रहिवासी असलेले माजी सैनिक दिलीपराव देशमुख व मुख्याध्यापक रेखा दिलीपराव देशमुख यांचे कनिष्ठ चिरंजीव मिथील भारतीय वायुसेना बंगळुरू येथील मेडिकल ट्रेनिंग सेंटर युनिटमधील कम्युनिकेशन टेक्निशियन या पदावर कार्यरत होते. भारतीय वायुसेनेत २०११ पासून त्यांनी सेवा दिली. १६ ऑक्टोबर रोजी पहाटे कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना वायुदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृतघोषित करण्यात आले. मिथिल यांच्यावर उद्या १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हिंदू स्मशानभूमी, वाडी खु. येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मिथिल यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ आदी आप्तेष्ट आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top