जातीआधारित सर्वेक्षणावरून राज्यसभेत खरगे व शिवकुमार यांच्यात खडाजंगी

बंगळुरू – कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी जातीआधारित सर्वेक्षण अहवालाला विरोध केला. यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत नाराजी व्यक्त केली. खरगे यांच्या नाराजीनंतर शिवकुमार यांनी आमचा जातीआधारित सर्वेक्षणाच्या अहवालाला विरोध नाही, फक्त हे सर्वेक्षण योग्य पद्धतीने व्हायला हवे असे आमचे मत आहे, असे शिवकुमार यांनी राज्यसभेत व्यक्त केले.
कर्नाटकमध्ये सत्तेत असताना काँग्रेसने २०१५-१७ मध्ये सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली जातीआधारित सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारने सार्वजनिक करावा, अशी मागणी भाजपने केली. मात्र वोक्कालिगा आणि लिंगायत समाजाने या सर्वेक्षणाला विरोध केला जातो. या सर्वेक्षणाचा अहवाल बाहेर आल्यास आमची संख्या कमी असल्याचे समोर येईल, अशी शंका या समाजाने व्यक्त केली. तर वोक्कालिगा समाज नाराज होऊ नये म्हणून शिवकुमार आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी या सर्वेक्षणाला विरोध केला. या कारणामुळे भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा पर्यंत केला.
खरगे यांनी भाजप आणि शिवकुमार या दोघांवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटले, “आमचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जातीआधारित सर्वेक्षण सार्वजनिक करण्याला विरोध करतात, असे सांगितले जात आहे. मात्र, या सर्वेक्षणाला भाजपचाही विरोध आहे. ” यावर शिवकुमार म्हणाले की, ‘मी जातीआधारित सर्वेक्षणाला विरोध केलेला नाही. हे सर्वेक्षण व्हायला पाहिजे ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. आम्हीच कर्नाटकमध्ये हे सर्वेक्षण केले होते. मात्र जातीआधारित सर्वेक्षण शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करणे गरजचे आहे.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top