जोगेश्वरीत ट्रकची टँकरला धडक एका चालकाचा जागीच मृत्यू

मुंबई

पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी येथे ट्रक आणि तेलवाहक टँकरची समोरासमोर धडक झाली. यात एका ४० वर्षीय टँकर चालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी वनराई पोलिसांनी ट्रक चालक रफीउल्ला खान याला अटक केली. ही घटना काल मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

काल मध्यरात्रीच्या सुमारास एक तेल टँकर वांद्राच्या दिशेने जात होता, तर ट्रक विरुध्द दिशेने म्हणजेच बोरिवलीच्या दिशेने जात होता. एनपीसीआय मेट्रो स्थानकाजवळ आले असता ट्रक चालकाचे गाडीवर वरील नियंत्रण सुटले. टँकर चालक विनोद कुमार यादव (४०) यांचेही वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो दुभाजकावरून उलटला. त्याचवेळी ट्रक जवळ आल्याने समोरासमोर धडक झाली. या अपघातात टँकर चालकाला गंभीर दुखापत झाली. यादव याला डोक्याला गंभीर जखम झाल्याने खूप रक्तस्त्राव झाला. त्याला जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. पंरतु त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी खान याला अटक केली. मृत चालक हा नवी मुंबईतील ऐरोली येथे राहणारा असून, आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील अमेठी येथील आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top