टाटा सन्स टीसीएसचे २.३४ कोटी शेअर विकणार

मुंबई :

देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या टाटा सन्सने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मधील आपला हिस्सा विकण्याचा निर्मय घेतला आहे. टाटा सन्स ब्लॉक डीलद्वारे ४००१ रुपये प्रति शेअर किमतीने टीसीएसचे सुमारे २.३४ कोटी शेअर विकणार आहे. टाटा सन्सला या डीलद्वारे ९३०० कोटी रुपये मिळतील. टीसीएसमध्ये टाटा सन्सचा ७२.३८ टक्के हिस्सा आहे.

टीसीएस ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी आहे. कंपनीचे मार्केट कॅप १५ लाख कोटी रुपये आहे. याच्या वर रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. रिलायन्सचे मार्केट कॅप १९.४७ लाख कोटी रुपये आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत टीसीएस ही देशातील सर्वात मोठी टेक कंपनी आहे. काल शेअर बाजार बंद होताना टीसीएसच्या एका शेअरची किंमत ४,१४४ रुपये होती.

टाटा सन्सला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन नियमांनुसार स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट व्हावे लागणार आहे. टीसीएसच्या या ब्लॉक डीलमुळे टाटा समुहाला टाटा सन्सचे सार्वजनिक मार्केट लिस्ट टाळायचे आहे. आरबीआयच्या नियमांनुसार सर्व मोठ्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांना स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट व्हावे लागणार आहे. टाटा सन्स देखील याच प्रकारात मोडते. या डिलमुळे कंपनीला लिस्टिंगपासून वाचता येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top