टीसीएस लाचखोरी प्रकरणी १६ कर्मचारी निलंबित

मुंबई

टाटा कॅन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) या भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीतील लाचखोरी प्रकरणी टीसीएसने १६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या ६ वेंडर्सना काळ्या यादीत टाकले आहे. टीसीएसला कर्मचारी पुरवणारे सहा वेंडर्स, त्यांचे मालक आणि सहयोगी कंपन्यांना टीसीएससोबत काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले. त्यानंतर याचा गांभीर्याने तपास करण्यात आला व शेअर बाजारात यासंदर्भात माहिती देण्यात आली. ब्लॅक लिस्ट केलेल्या ६ कंपन्या टीसीएसच्या वेंडर्स होत्या. त्या कंत्राटी पद्धतीने कर्मचारी पुरवत होत्या. या प्रकरणी आतापर्यंत १९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यापैकी १६ जणांना निलंबित करण्यात आले, तर ३ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या कामावरून काढण्यात आले, असे कंपनीने शेअर बाजाराला सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top