ठाणे जिल्हा रूग्णालयात नवीन वातानुकूलित यंत्रणा

ठाणे-ऐन उन्हाळ्यात आता ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल म्हणजेच जिल्हा रुग्णालयात रुग्णांना थंडगार हवा मिळणार आहे. कारण १५० खाटांच्या बंदिस्त तंबूमध्ये नवीन वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे.

या सिव्हील रूग्णालयाच्या भव्य इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी तब्बल नऊ महिन्यांपूर्वी सिव्हील रुग्णालय पाडून या जागेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम सुरू आहे. पण रूग्णांच्या सेवेत खंड पडू नये, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वागळे इस्टेट मनोरुग्णलय शेजारी आरोग्य विभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपाचे सिव्हील रुग्णालय सुरू केले आहे. रुग्णांना चांगले उपचार देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाचा असून दरदिवशी सुमारे ५०० ते ६०० रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात ३४६ खाटा असून यापैकी सुमारे १५० खाटा या टेंट म्हणजेच तंबूमध्ये आहेत.आता उष्मा वाढल्याने टेंटमधील वातावरण तापत आहे. त्यावर मात करण्यासाठी रुग्णाच्या सोयीसाठी टेंट वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या सिव्हील रुग्णालयात टेंट मध्ये कुलर फॅन आणि वातानुकूलित यंत्र बसवले जाणार आहेत. टेंटच्या तीन भागांत जनरल, औषधे, महिला, ओर्थो इत्यादी विभागासाठी खाटा आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top