डबेवाला कामगारांना दिवाळी बोनस द्या!

मुंबई :

ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगता, डबेवाला न चुकता आपल्या ग्राहकांना डबा पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडत असतो. दिवाळीत मिळणारा बोनस प्रत्येक कामगारांचा अधिकार असून डबेवाल्याची सेवा लक्षात घेता, ग्राहकांनी डबेवाला कामगाराला एका महीन्याचा अधिकचा पगार दिवाळी बोनस म्हणून द्यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त डबेवाला कामगार चार दिवस सुट्टीवर जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

दिवाळी सणानिमित्त प्रत्येक जण आपापल्या गावी किंवा नातेवाईकांकडे जातो. त्यामुळे दिवाळीनिमित्त डबेवाला कामगार दिवाळी सणानिमित्त १३ ते १६ नोव्हेंबर चार दिवस सुट्टीवर जाणार आहे. या चार दिवसांमध्ये दोन शासकीय सुट्या आहेत. १७ नोव्हेंबर शुक्रवार रोजी डबेवाला कामगार आपल्या नेहमीच्या वेळी कामावर रूजू होईल. परंतु चार दिवस घेतलेल्या सुट्टीचे वेतन कापू नये, अशी मागणी ग्राहकांकडे केल्याचे तळेकर म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top