डाळींचे भाव पुन्हा कडाडले! सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री

मुंबई- सणासुदीच्या काळात डाळीच्या वाढलेल्या मागणीमुळे डाळींचे दर पुन्हा गगनाला भिडले आहेत. किरकोळ बाजारपेठेत तूरडाळ २२० रुपये प्रतिकिलो तर, उडीदडाळ १८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. मूगडाळ, मसूरडाळ आणि चणाडाळीच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. मुंबईत मुगडाळ १६० रुपये प्रतिकिलोवर गेली आहे. तर मसूरडाळ १४० रुपये प्रतिकिलो आणि चणाडाळ ११० रुपये प्रतिकिलो या भावाने विकली जात आहे. या नव्याने वाढलेल्या भावांमुळे सर्वांचे आर्थिक गणित बिघडण्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे. डाळीच महागल्या तर आम्ही खायचे तरी काय?असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top