डुकराची किडनी लावून डॉक्टरांनी महिलेला वाचवले

ट्रेंटन

अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये डॉक्टरांच्या एका टीमने मृत्यूच्या दारात असलेल्या महिलेचा जीव वाचवला. या महिलेचे हृदय आणि मूत्रपिंड जवळजवळ बंद पडले होते, मात्र डॉक्टरांनी या महिलेच्या शरीरात डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करून यांत्रिक पद्धतीने तिचे हृदयाचे ठोके पुन्हा सुरू केले. लिसा पिसानो असे या महिलेचे नाव आहे. तिच्या शरीरात दुसऱ्या मानवाचे अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य नव्हते. एनव्हाययु लँगोन हेल्थ मेडिकल इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी तिच्या हृदयाचे ठोके सुरू ठेवण्यासाठी एक यांत्रिक पंप बसवला. काही दिवसांनी एका जनुकीय सुधारणा केलेल्या डुकराची किडनी प्रत्यारोपित करण्यात आली. गेल्या महिन्यात मॅसॅच्युसेट्स रुग्णालयात तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने पिसानोच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top