तलावाचे गुलाबी पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

हवाई

आधुनिक काळात बदलते हवामान आणि वाढत्या प्रदूषणामुळे सतत काही ना काही विविध घटना पर्यावरणाबाबत घडत असतात. अशीच एक घटना म्हणजे, हवाईतील एका प्रसिध्द तलावाचे पाणी अचानक गुलाबी झाले. हे गुलाबी पाणी पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हवाईतील मौवी प्रदेशातील नॅशनल वाईल्ड लाईफ रिफ्यूजी या ठिकाणी हे तलाव आहे.

आता पर्यंत अशा प्रकारे कधीही या तलावाचा रंग बदलला नव्हता. त्यामुळे या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या आणि परिसरातील स्थानिक नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत तलावाच्या प्रदेशाचे व्यवस्थापन बघणारे ब्रेड वुल्फ यांनी माहिती दिली आहे. तलावाचा निळा रंग बदलून गुलाबी का झाला, याबाबत संशोधकांनीही चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षापासून या प्रदेशात दुष्काळाचे सावट आहे. त्याचाच परिणाम या तलावाच्या पाण्यावर झालाा का?, अशी शंका व्यक्त केली जात आहे. पाण्यात विषारी पदार्थ मिसळल्यामुळे त्याचा रंग बदलला का?, अशी शंकाही काहींनी उपस्थित केली. परंतु पाण्याची चाचणी केल्यानंतर त्यामध्ये कोणताही विषारी पदार्थ आढळला नाही. या तलावाच्या पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढल्याने पाणी गुलाबी झाले असावे, असा निष्कर्ष वैज्ञानिकांनी काढला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top