तामिळनाडूत अवकाळी पाऊसशाळांना सुट्टी!रेल्वे विस्कळीत

चेन्नई
तामिळनाडूमधील तिरुनेलवेली, कन्याकुमारी, थूथुकुडी, तेनकासी, विरुथुनगर, पुधुकोट्टई, नीलगिरी, थेनी या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले. या पावसामुळे तामिळनाडूतील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. थूथुकुडी, कन्याकुमारी, तेनकासी, तिरुनेलवेली आणि थेनी या पाच जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली.
संपूर्ण तामिळनाडूसह केरळ आणि पुद्दुचेरीमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तामिळनाडूसह केरळमधील अनेक जिल्ह्यांत सखल भागात पाणी तुंबले. मुसळधार पावसामुळे कोसळलेला ढिगारा कुन्नूर-उदगमंडलम रेल्वे मार्गावर आला. त्यामुळे या मार्गावरील फेर्या रद्द करण्यात आल्या. रद्द केलेल्या गाड्यांच्या प्रवाशांना तिकिटांचा संपूर्ण परतावा दिला जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. कुन्नूर-मेट्टुपलायम रस्त्यावर झाडे पडल्याने तेथील वाहतूक विस्कळीत झाली. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. चेन्नईच्या मूलक्कोथलम येथील सब-वेमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने एमटीसी बस अडकली. दरम्यान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, कर्नाटक या राज्यांच्या काही भागांमध्ये उद्या मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top