तिसर्‍या मुंबईला शेतकर्‍यांचा विरोध! सामूहिकपणे नोंदविल्या हरकती

नवी मुंबई- उरण, पेण आणि पनवेल परिसरातील काही गावांचा समावेश असलेल्या तिसर्‍या मुंबईची निर्मिती करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला तब्बल १२४ गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे.यासाठी या ग्रामस्थांनी काल सीबीडी बेलापूर येथील एमएमआरडीएच्या कार्यालयात जाऊन सामूहिकपणे हरकती नोंदविल्या.
काही दिवसांपासुन या हरकती नोंदविण्यासाठी ग्रामस्थांनी गावोगावी जनजागृती बैठका घेतल्या होत्या. तसेच या तिसर्‍या मुंबईच्या योजनेविरोधात ग्रामपंचायतींनी ठराव करून ते शासनाला दिले आहेत. अटल सेतू मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक भोवती ही ‘तिसरी मुंबई’ विकसित करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला या ग्रामस्थांनी विरोध केला आहे.भांडवलदारांच्या फायद्यासाठीच सरकार त्यांच्या समाजाला भूमिहीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी या हरकती नोंदविल्या आहेत.
माजी आमदार व रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या उपस्थितीत एमएमआरडीएचे सह सहसंचालक जितेंद्र भोपळे यांच्याकडे या हरकती सादर केल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top