तुळशीबागेत श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा

पुणे :

पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या मंदिरामध्ये फुलांनी सजलेल्या सभामंडपात २६३ वा श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा झाला. श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात सकाळी श्रीरामाची मुख्य पूजा पार पडली. मंदिर परिसरात श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली. ह.भ.प. दर्शन बुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा साजरा झाला. सायंकाळी श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकात पुणेकरांनी पुष्पवृष्टीने मिरवणुकीचे स्वागत केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top