तेलुगू देसम पार्टीचे पी चंद्रशेखर देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार

अमरावती- आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघातून तेलुगू देसम पक्षाकडून पी चंद्रशेखर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. चंद्रशेखर यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे ५,८८५कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे.एव्हढी संपत्ती असलेले ते देशातील सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले होते की,मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ हे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सर्वात श्रीमंत उमेदवार होते.नकुल नाथ यांच्याकडे सुमारे ७१७ कोटींची संपत्ती आहे.मात्र आता चंद्रशेखर यांनी त्निवडणूक प्रतिज्ञापत्रात ५,८८५ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जाहीर केल्याने ते सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top