तैवानने चीनची दहशत झुगारली! पुन्‍हा सत्ताधारी डीपीपी विजयी

तैपेई – तैवानला आपल्‍या दहशतखाली ठेवण्‍याचे चीनचे स्वप्न पुन्‍हा एकदा धुळीला मिळाले. तैवानमधील निवडणुकीत सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (डीपीपी) अध्यक्षपदाचे उमेदवार लाइ चिंग-ते यांच्‍याकडेच पुन्‍हा एकदा सत्ता दिली. लाइ चिंग-ते यांना ४१ टक्‍के मते मिळाली, तर त्‍यांचे दोन मुख्य प्रतिस्पर्धी अनुक्रमे ३३ आणि २६ टक्के मतांनी पिछाडीवर राहिले. कालच्या निवडणुकीत तैवानच्या सत्ताधारी पक्षाने सलग तिसर्‍या अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीत बाजी मारली.
तैवान हे चीनच्‍या अग्‍नेय समुद्र किनार्‍याजवळ असणारे बेट आहे. तैवान स्वत:ला एक स्वतंत्र राष्ट्र मानतो. त्यांची स्वत:ची घटना आहे आणि येथील जनतेने निवडून दिलेल्या नेत्यांचे तिथे सरकार आहे. तैवान हा आमचाच प्रांत आहे. एक दिवशी तो चीनचा भाग होणार आहे, असा दावा चीनने अनेकदा केला आहे. लाइ चिंग-ते यांना मतदान करू नये, असा धमकी वजा इशारा चीनने दिला होता. तैवानच्‍या जनतेने या धमकीला न जुमानता पुन्‍हा एकदा सत्तााधारी लाइ यांना विजयी केले. लाई याने चीनचा वर्चस्‍ववादला तीव्र विरोध केला आहे. ते सलग तिसर्‍यांदा देशाचे अध्‍यक्ष होण्‍यासाठी सज्‍ज झाले आहेत. तैवानचे विद्यमान उपाध्यक्ष लाय चिंग-ते निवडणुकीत विजयी झाल्‍याचे काल सायंकाळी घोषित करण्‍यात आले. याशिवाय त्यांच्या २ प्रमुख विरोधी प्रतिस्पर्ध्यांनी पराभव मान्‍य केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top