तैवान चीनच्या ताब्यात घेणारच जिनपिंग यांच्या अमेरिकेत निर्धार

वॉशिंग्टन :

‘तैवान ताब्यात घेणारच’ असा निर्धार अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत जिनपिंग यांनी कॅलिफोर्नियात चर्चा केली. चीन- अमेरिका दरम्यानचा तणाव कमी करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. वर्षभरानंतर या दोन नेत्यांची भेट झाली.

यंदा जिनपिंग यांनी रशिया, दक्षिण आफ्रिका व अमेरिका असे तीन परदेश दौरे केले आहेत. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जाते. सॅनफ्रान्सिस्कोमध्ये आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य परिषदेत बायडेन- जिनपिंग भेटले. चीन व अमेरिकेदरम्यान लष्करी संवाद पुन्हा सुरू करण्याबाबत सहमती दर्शवण्यात आली. या बैठकीत दोन्ही देशांतील मतभेद उघड झाले आहेत.

जिनपिंग यांनी अमेरिकेला सांगितले की, ‘अमेरिकेने तैवानला शस्त्रास्त्र देणे बंद करावे. आम्ही तैवानला चीनमध्ये सहभागी करून घेतल्याशिवाय राहणार नाही. चीन अमेरिकेला मागे टाकून त्याची जागा घेऊ इच्छित नाही. मात्र, अमेरिकेने चीनवर दबाव आणणे थांबवावे. पृथ्वी इतकी मोठी आहे की, येथे दोन महासत्ता राहू शकतात. आमचा देश अमेरिके- पेक्षा वेगळा आहे. या दोन्ही देशांनी एकमेकांकडे दुर्लक्ष करून योग्य ठरणार नाही. दोन्ही देशांत संघर्ष व वाद निर्माण झाल्यास त्याचे परिणाम भयानक होऊ शकतात.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top