थंडी वाढताच करोना सक्रिय देशभरात १२२ जणांना बाधा

मुंबई :

करोना व्हायरसची दहशत आता संपली असली तरी तो पुन्हा डोके वर काढण्याची भीती वर्तवली जात आहे. हिवाळा सुरु झाल्याने पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात काल ३ करोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर देशात १२२ रुग्ण आढळले आहेत.

राज्यात मागील अनेक महिन्यांपासून करोनाची रुग्णसंख्या घटली होती. एकही करोना रुग्ण आढळत नव्हता. मात्र आता तापमान घसरल्याने करोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. गेल्या वर्षीही हिवाळा सुरु होताच अचानक कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता सावध राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

सध्या करोनाची आकडेवारी भीतीदायक नसली तरी, काळजी घेणे आणि कोरोनाच्या नियमांचेही पालन करणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे यांसारख्या नियमांचा वापर करणे प्रत्येकासाठी फायद्याचे ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top