दक्षिण आफ्रिकेत बस दरीत कोसळली

४६ प्रवाशांपैकी ४५ ठार

प्रिटोरिया :

दक्षिण आफ्रिकेत एक भीषण बस अपघात घडला. पुलावरून बस ५० मिटर खाली दरीत कोसळली. ज्यामध्ये बसमधील ४६ पैकी ४५ प्रवासी ठार झाले आहेत. या दुर्घटनेत फक्त एक आठ वर्षीय मुलगी बचावली असून तिला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बस पुलावरील अडथळ्याला धडकून दरीत कोसळली, त्यानंतर बसला आग लागली. बस बोट्सवाना देशात इस्टर भाविकांना घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर पूर्व भागातील लिम्पोपो प्रांतातील शहर मोरिया येथे जात होती. दक्षिण आफ्रिकेतील प्रसारमाध्यमांनी सांगिल्याप्रमाणे, बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळली. काल रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top