दहावी, बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे, तर दहावीची लेखी परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च २०२४ या कालवधीत होणार आहे. याआधी महाराष्ट्र शिक्षण मंडळाने या परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले होते.

फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत, याची माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahasscboard.in वर उद्यापासून उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top